औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर त्यांच्या भाषणाचा औरंगाबाद पोलिसांनी तातडीने अभ्यास करून त्याचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात बैठक झाली. त्यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यासाठी राज ठाकरे यांना अटक करावी लागणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना आधी नोटीस द्यावी लागणार आहे. त्याकरता पोलीस मंगळवारी, ३ मे २०२२ रोजी संध्याकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ बंगल्यावर दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कारवाई
या सभेच्या आधी पोलिसांनी १६ अटी लावल्या होत्या. त्याअटींचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात १२ अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात ४ गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. त्यातील १५३ अ हे कलम सर्वात गंभीर आहे. त्यासाठी राज ठाकरे यांना अटक करावीच लागेल. त्यांना त्यानंतर न्यायालयच त्यांना जामीन देऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र त्याआधी पोलिसांना राज ठाकरे यांना नोटीस द्यावी लागणार आहे. त्यासाठी पोलीस राज ठाकरे यांच्या घरात दाखल होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक होण्याची दात शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा … तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील, सरकारने तयार रहावे; मनसेचा इशारा )
Join Our WhatsApp Community