राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात मंगळवारी दुपारी एक बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. त्यानुसार औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच भाजप उतरली मैदानात!)
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार, आता पोलिसांना कारवाई करण्यासाठी आता कुठल्याही प्रकारचा दबाव नसेल हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय नेते आणि पोलीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्रतेने बघायला मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra HM briefed CM Uddhav Thackeray on the law and order situation in the state. CM ordered that Police should take all measures to maintain law & order and not wait for anyone's order.
Maharashtra DGP & CM had a telephonic conversation, law & order situation discussed.
— ANI (@ANI) May 3, 2022
मंगळवारी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर गृहमंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाला सांगितलं की, “पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये”
Join Our WhatsApp Community