राज ठाकरे यांच्याविरुद्ध सांगली न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. न्यायालयाने काढलेले वॉरंट राज ठाकरे यांना बजावणे बंधनकारक असल्याने मुंबई पोलीस हे सांगली न्यायालयाचे वॉरंट बजावण्याची शक्यता आहे.
याआधी अटकेच्या वेळी तीव्र पडसाद उमटले
परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून २००८ मध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी कल्याण पोलिसांनी राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती, राज ठाकरे यांच्या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. सांगली जिल्ह्यातही राज ठाकरे यांच्या अटकेविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शिराळा तालुक्यात तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात मनसे नेते तानाजी सावंत यांच्यासह राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा राज ठाकरे अटकेला सामोरे जाणार! मनसेची भूमिका स्पष्ट)
राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले
२००९ साली या गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरे यांनी शिराळा न्यायालयामध्ये हजर राहून जामीन घेतला होता. जामीनानंतर हा खटला न्यायालयात उभा राहिल्यानंतर राज ठाकरे सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्यामुळे राज ठाकरे यांना वॉरंटची मुंबई पोलिसांकडून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करताना राज ठाकरे यांना अटक करून सांगली न्यायालयासमोर हजर करण्यात येऊ शकते, त्यानंतर न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे यांना जामीन मंजूर होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community