मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सक्षम आहे. विशेष म्हणजे याविषयावर बोलताना संजय राऊत यांनी ‘राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार’ असे म्हटल्यामुळे संजय राऊतांचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.
मनसे नेत्यांनी शेअर केला व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंना हिंदू औवेसी म्हटले होते. त्यावरुन मनसेचे नेते आणि संजय राऊत यांच्यात एकमेकांवर जबरी टीका होत आहे. मनसेने आता संजय राऊत यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राजू पाटील आणि मनसेचे अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत संजय राऊत हे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना यांच्याऐवजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे नाव घेतले आहे. राज्यात 2019 च्या विधानसभा निकालानंतर अनपेक्षित अशा महाविकास आघाडीची स्थापना झाली. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडीची स्थापन होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे सर्वाधिक 106 आमदार असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. संजय राऊत आणि शरद पवार यांच्या जोडीने हे सरकार अस्तित्वात आले. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संजय राऊत यांचा एक व्हिडिओ शेअर केला.
(हेही वाचा औरंगाबाद सभा : राज ठाकरे आरोपी क्रमांक १)
Join Our WhatsApp Community