भोंगा हा महत्त्वाचा मुद्दा नाही, रझा अकादमीसारख्या संघटना खरी समस्या; भाजपची भोंग्याच्या वादात उडी

113

भोंगा हा महत्त्वाचा मुद्दा नाही तर रझा अकदमीसारख्या संघटना खरी समस्या असल्याचे, भाजपचे नेते,  आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी नितेश राणेंकडून करण्यात येत आहे. रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना समाजामध्ये विष कालवतात, असा आरोप नितेश राणेंकडून करण्यात आला आहे. नितेश राणेंनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले नितेश राणे

नितेश राणे म्हणतात, लाऊड स्पीकर ही खरी समस्या नाही. खरी समस्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना आहेत. या संघटना समाजामध्ये विष पसरवतात. त्यांच्याविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. या संघटनांवर बंदी घातली जावी यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. अशी बंदी घातली जाईल, तेव्हा शांतता नांदेल. रझा अकादमीसारख्या दहशतवादी संघटनेची  चॅरिटी कमिशनकडे नोंदणी नाही. नोंदणा नसतानाही ही संघटना सुरु आहे. त्यांना निधी कुठुन येतो हे कसं कळणार त्यांचे सगळे धंदे थांबवले पाहिजेत.

( हेही वाचा: आता ट्विटर वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे, एलाॅन मस्क यांची मोठी घोषणा )

भाजपचे समर्थन?

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी  भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेवरुन मनसे आक्रमक झाली. आता भाजप नेते नितेश राणे यांनी आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट केला आहे. त्यामुले मनसेच्या भोंग्यांविरुद्धच्या या लढाईला भाजपची साथ असल्याचे दिसून येत आहे. सध्या राणेंनी केलेल्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.