खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये ज्याप्रकारे वागणूक देण्यात आली आहे. हे पाहता यातून इंग्रजांच्या काळातील जेलची आठवण येत आहे, असे भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या म्हणाले.
स्पॉन्डिलेसिस आजाराकडे जेल प्रशासनाचे दुर्लक्ष
नवनीत राणा यांना जामीन दिल्यावर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सोमय्या त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी बोलत होते. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे कारागृहातील अनुभव ऐकून ठाकरे सरकारमधील कारागृह हे इंग्रजांच्या काळातील आहेत का, असे वाटत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खासदार राणा यांना ७ तास पाणी दिले नाही, नवनीत राणा यांनी जेल प्रशासनाने त्यांना होत असलेल्या स्पॉन्डिलेसिस आजाराबाबत सांगितले तरी डॉक्टरांनी ते गांभीर्याने घेतले नाही. ज्या देशात राम मंदिर निर्माण होत आहे, त्या देशात हनुमान चालीसा म्हणण्यास प्रतिबंध केला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असेही सोमय्या म्हणाले.
(हेही वाचा अन् नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला)
नवनीत राणांना फरशीवर झोपवले
नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत. त्यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना फरशीवर बसून ठेवले, झोपायला लावले, नवनीत राणा यांनी डॉक्टरांना त्यांच्या स्पॉन्डेलिसिस आजाराबाबत सांगितले, पण जेल प्रशासनाने त्याविषयी कोणतीही कारवाई केली नाही. हे इंग्रजांच्या काळातील जेल प्रशासनाची आठवण येते, याचा देशातील प्रत्येक नागरिकाला संताप येत असेल, असेही सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community