येत्या रविवारी होणार प्रवाशांचा खोळंबा! या मार्गांवर असणार मेगाब्लॉक

96

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ८ मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

( हेही वाचा : दहिसर-बोरीवलीकरांचा येणारा मंगळवार पाणी कपातीचा! )

मध्य रेल्वे मार्गावर या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक

  • माटुंगा – मुलुंड जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३९ या वेळेत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान चालणाऱ्या गाड्या त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
  • ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. पुढे माटुंगा येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

    • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईनवर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि
      चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक.
    • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या गाड्या बंद राहतील.
    • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.

मेगाब्लॉक कालावधीत विशेष गाड्या

  • तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.