देशातील जुन्या बँकांपैकी एक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ही बँक देशभरात असणाऱ्या एकूण 13 टक्के शाखा बंद करणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
(हेही वाचा: ‘ही’ आहे इंग्रजांच्या काळातली भारताची पहिली ‘आत्मनिर्भर’ बँक)
मालमत्तांचीही होणार विक्री
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरात जवळपास 5 हजार शाखा आहेत. त्यापैकी 600 शाखा ही बँक बंद करणार आहे. यातील काही शाखा या कायमस्वरूपी बंद होणार असून, काही शाखांचे दुसऱ्या शाखांत विलीनीकरण होणार आहे. मार्च 2023 पर्यंत या शाखा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत. याबरोबरच ही बँक आपल्या मालमत्तांचीही विक्री करणार आहे.
(हेही वाचा: मोबाईल हरवला तर पोलिसांच्या ‘या’ अॅपवर करा तक्रार)
पहिली स्वदेशी बँक
इंग्रजांच्या काळात भारतात बँकिंग क्षेत्राने पायाभरणी करायला सुरुवात केली. त्याचवेळी भारतात स्वदेशीची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू होती. त्यामुळे भारतात एक स्वदेशी बँक स्थापन करण्याची कल्पना सर सोराबजी पोचखानवाला यांच्या मनात आली. याच कल्पनेतून सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक 1911 साली स्थापन झाली. मुख्य म्हणजे या बँकेतील सर्व कर्मचारीही भारतीयच होते. या वैशिष्ट्यामुळे त्यावेळी या बँकेची पहिली स्वदेशी बँक अशी ओळख निर्माण झाली. या बँकेची मुख्य शाखा मुंबईतील हुतात्मा चौक येथे आहे.
(हेही वाचा: ATM ट्रांजेक्शन अपूर्ण, तरीही पैसे कट झाले? काय कराल)
Join Our WhatsApp Community