मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्यातील मशिदींना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले होते. पण हे आदेश न पाळल्याने आता मुंबईतील दोन मशिदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मशिदींवर कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजांच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील दोन मशिदींवर वांद्रे आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन न केल्याचा आरोप या मशिदींवरील विश्वस्तांवर करण्यात आला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या भूमिकेवर हिंदू समाजच नाराज, राऊतांचा घणाघात)
राज ठाकरेंच्या भूमिकेचा परिणाम
या मशिदींवर झालेली कारवाई ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचाच परिणाम आहे. एका धर्माला एक न्याय आणि दुसरा धर्माला वेगळा न्याय याविरोधातच राज ठाकरे यांनी आपल्या सभेत आवाज उठवला होता. त्यामुळे सरकारला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे सरकार आणि मुंबई पोलिसांचे आभार मानतो, असे मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांनी म्हटले आहे.
दुजाभाव नाहीसा झाला
आतापर्यंत गणपती, नवरात्री या हिंदू सणांच्या बाबतीत दुजाभाव करण्यात येऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. मात्र आता राज ठाकरे यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर दोन धर्मांतील तेढ कमी होऊन हा प्रश्न सुटला असल्याचे देखील काळे यांनी सांगितले.
(हेही वाचाः राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बिल, वाचा कोणाची किती थकबाकी)
Join Our WhatsApp Community