तब्बल १२ वर्ष इस्लामचं शिक्षण घेतलेल्या एका तरूणाने इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. 24 वर्षीय या तरूणाचे नाव अस्कर अली असे असून केरळच्या कोलम जिल्ह्यात राहतो. १२ वर्ष इस्लामचे शिक्षण घेतल्यानंतर त्याचा भ्रमनिरास झाल्याची कबुली त्याने स्वतः दिली. भारतीय सैन्यात गेल्यास पाकिस्तानी लोकांवर गोळ्या झाडाव्या लागतील, त्यामुळे भारतीय लष्करात जाऊ नका, ही शिकवण इस्लामचं शिक्षण घेताना दिली जायची. ही शिकवण त्याला पटली नाही तो नाराज असल्याने त्याने इस्लाम धर्म सोडल्याचे सांगितले. इस्लाम धर्म सोडल्यानंतर कुटुंबियांसह नातेवाईकांकडून आणि इस्लाम समुदयाकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – NIA ची मोठी कारवाई, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या मुंबईतील 20 अड्ड्यांवर छापेमारी)
तरूणाने सांगितले, का सोडला इस्लाम धर्म?
अस्कर अली यांनी मलाप्पुरममधील एका प्रमुख धार्मिक अकादमीमधून हुडावी धार्मिक कार्यक्रमाची 12 वर्षे पूर्ण केली होती. त्याने सांगितले की, आम्हाला इतर धर्माच्या लोकांचा द्वेष करणे आणि आपल्या धर्मावर प्रेम करणे शिकवले जाते. इतकंच नाही तर, मुस्लीम लोकांनी भारतीय सैन्यात सामील होऊ नये. कारण सैन्यात गेल्यामुळे मुस्लिम समाजातील बांधवांना मारण्यास शिकवले जाते. इस्लाम हा खरा फॅसिझमसारखा आहे, असे त्यांने स्पष्टपणे म्हटले आहे.
नातेवाईकांकडून झाला अपहरण करण्याचा प्रयत्न
पुढे अली असेही म्हणाला की, 1 मे रोजी एसेन्स ग्लोबल कॉन्फरन्सला संबोधित करण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांनी माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांसह दहा सदस्यीय टोळीवर कोल्लममध्ये अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप अलीने केला असून कोल्लम पोलिसांनी अस्कर अली यांच्या तक्रारीनंतर 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 1 मे रोजी कार्यक्रमाला संबोधित करू नये, म्हणून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नातेवाईकांना माझा मोबाईल फोडला, माझे कपडेही फाडले. जेव्हा आरोपी मला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये लॉक करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा स्थानिक लोकांनी आरडाओरडा करून मला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे अलीने सांगितले.