बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने आता राजकीय वातावरण तापले असून, आता यावरून आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. शिवसेनेने पुण्यात या घटनेवरून कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर, आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे! पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का?” असा सवाल आशिष शेलार यांनी करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे!
पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? pic.twitter.com/aaXjePCGKV— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020
काय म्हणालेत नेमकं आशिष शेलार
कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणं याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या देशामध्ये, अखंड हिदुस्थानमध्ये कधीही कोणी करता कामा नये, जो होऊ आम्ही देणारही नाही. या सगळ्या घटनाक्रमाच्या मागे स्थानिक काँग्रेस आमदार सतीष जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, या पुतळ्याला हटवण्याची आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष असलेल्या या जारकीहोळींच्या विरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? सवाल आमचा तुम्हाला आहे. आंदोलन छत्रपतींसाठी करायला लागलं तर त्यासाठी परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधीपक्ष नेता व भाजपाच्या परवानगीची गरज का लागते? या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हालाच द्यावं लागेल. त्यामुळे छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने, जसं तहसीलदार आणि पोलीस पाटील यांनी सांगितलं. त्या पद्धतीनेच झाला पाहिजे, कर्नाटक सरकारला आमची विनंती आहे. शिवसेनेने आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही याचं उत्तर द्यावं.” असे आशिष शेलार म्हणालेत.
Join Our WhatsApp Community