मध्य रेल्वे कोविड काळापूर्वी दररोज सुमारे ४५ लाख प्रवासी आणि सध्या सुमारे ३५ लाख प्रवाशांना वाहतूक सेवा देते. शेवटची लोकल आपल्या स्थानकापर्यंत पोहोचण्यापूर्वी, पहिली लोकल आपला प्रवास सुरू करते म्हणून या लोकलला मुंबईची जीवनरेखा (LIFELINE) म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत लोकल मध्यरात्री ००.२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते आणि कर्जतला ०२.४५ वाजता पोहोचते. ही लोकल कर्जतला पोहोचण्यापूर्वीच कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल ०२.३३ वाजता आपला प्रवास सुरू करते.
( हेही वाचा : या मार्गावरील एसी लोकल बंद होणार? )
लोकल २४ तास कशा चालवल्या जातात याबाबतची माहिती
- कुर्ला, कळवा आणि सानपाडा असे तीन कारशेड आणि रात्रीचे स्टॅबलिंग डेपो आहेत जेथे रेल्वेची दररोज रात्री तपासणी केली जाते. कुर्ला, कळवा आणि सानपाडा कारशेड येथे रात्री/दिवसाच्या वेळी १५ दिवसांच्या अंतराने गाड्यांची तपासणी केली जाते. या शेड्यूलमध्ये ब्रेक गियर आणि प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष दिले जाते.
- ६० दिवसांच्या अंतराने केलेल्या तपासणी शेड्यूलमध्ये सर्व विद्युतीय वस्तू, प्रवाशांच्या सुविधांच्या वस्तू तपासल्या जातात.
८ महिन्यांच्या अंतराने केलेल्या दुसर्या तपासणी शेड्यूलमध्ये बॅटरी, लो टेंशन जंपर्स, कप्लर्स, सस्पेंशन, व्हील पॅरामीटर्स, रॉड गेज इ. तपासले जाते. - रेकची साफसफाई : ड्राय क्लीनिंग, ओले मॉपिंग, रेक धुणे इत्यादी नियमित अंतराने केले जातात. डब्यांमध्ये जंतुनाशकांची फवारणी केली जाते, तसेच अनधिकृत पोस्टर्स काढले जातात.
- याशिवाय, कारशेडमधील मनुष्यबळ, ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक असलेले मोटरमन आणि गार्ड यांचे वेळापत्रकही आगाऊ तयार केले जाते जेणेकरून लाईफलाइन सुरळीत चालू शकेल.
मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
- गाड्या स्वच्छ ठेवणे
- ट्रॅक न ओलांडणे, दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उडी घेऊ नये
- लिफ्ट आणि एस्केलेटरचा वापर करणे