एप्रिल महिन्याच्या अखेरीस रत्नागिरीतील व्हेल सदृश माशाचा, मृतदेह गणेशगुळे किनारपट्टीवर आढळला. अंदाजे 12 फुटांच्या माशाला स्थानिक गावाकऱ्यांनी किनारपट्टीवर पुरल्याने वनाधिकाऱ्यांना पुन्हा वाळू उपसून माशाच्या मृतदेहाची तपासणी करावी लागली. मात्र हा मासा ओळखता येत नसल्याने वनविभागाच्या कांदळवन विभागाने माशाचा डिएनए प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : यंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे )
समुद्री वन्यजीवांना कायद्याने संरक्षण
ही घटना 27 एप्रिल रोजी घडली. घटनेच्या दिवशी गणेश गुळे किनारपट्टीजवळ राहणाऱ्या गावाकऱ्यांनी किनाऱ्यावर महाकाय माशाला पाहिले. त्याला पुन्हा समुद्रात पाठवण्यासाठी गावाकऱ्यांनी प्रयत्न केले. भरतीच्या पाण्यासह मासा पुन्हा समुद्रात गेल्याने गावाकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु सकाळी पुन्हा किनाऱ्यावर माशाचा मृतदेह आढळला. अखेरीस गावाकऱ्यांनी त्याला तिकडेच वाळूत पुरण्याचा निर्णय घेतला. याबाबत वनविभागाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्री वन्यजीवांना कायद्याने संरक्षण दिले जाते, वनविभागाच्या सल्ल्याशिवाय त्यांना हाताळता येत नाही, या नियमांबाबत अनभिज्ञ असलेल्या गावाकऱ्यांमुळे वनधिकाऱ्यांनी वाळूत पुरलेला व्हेल सदृश माशाचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला. या माशाचा डिएनए मुंबईत काही महिन्यांपूर्वी महालक्ष्मी येथे आढळलेल्या व्हेल माशाचा डिएनएसह कांदळवन कक्ष प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Communityगणेशगुळे येथे व्हेल सदृश आढळलेल्या माशाच्याबाबतीत फोटोतून नेमकी ओळख पटत नाही आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतून डिएनए नमुन्याची तपासणी केली जाईल.
– हर्षल कर्वे, सागरी जीवशास्त्रज्ञ, कांदळवन कक्ष, वनविभाग