ब्रेकिंग: राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होणार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार

128

देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार असणार आहेत. राजीव कुमार 15 मे रोजी पदभार स्वीकारतील. राजीव कुमार यांच्या नियुक्तीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची जागा राजीव कुमार घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे.

कायदामंत्री किरन रिजजू यांनी ट्विट केले आहे की, “घटनेच्या कलम 324 च्या कलम (2) नुसार, राष्ट्रपतींनी राजीव कुमार यांची 15 मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. राजीव कुमार यांना माझ्या शुभेच्छा.”

( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )

कोण आहेत राजीव कुमार?

राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. सुशील चंद्र यांचा कार्यकाळ शनिवारी पूर्ण होत असल्याचे, नियुक्ती पत्रात म्हटले आहे. राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. निवडणूक आयोगात पदभार स्वीकारण्यापूर्वी राजीव कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष होते. ते एप्रिल 2020 मध्ये पीईएसबीचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते. राजीव कुमार हे बिहार/झारखंड केडरचे 1984 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत आणि फेब्रुवारी 2020 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.