आता गुगल ट्रान्सलेटरवर संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी भाषेचाही समावेश

143

गुगलने भाषांतरासाठी मोठे अपडेट केले आहे. गुगल ट्रान्सलेटरने भारतातील ८ नवीन भाषांचा समावेश केला आहे. त्यामध्ये संस्कृत भाषेचा समावेश आहे, तसेच कोकणी आणि भोजपुरी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता गुगल ट्रान्सलेटरवर भारतीय भाषांची संख्या १९ वर पोहचली आहे.

संस्कृत ही गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची

गुगलच्या नवीन अपडेटनंतर गुगलमध्ये संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येणार आहे. या अपडेटनंतर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये भाषांतर करता येणार आहे. बुधवारी उशिरा सुरू झालेल्या वार्षिक गुगल परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सध्या गुगल भाषांतर प्लॅटफॉर्मवर नवनवीन प्रादेशिक भाषा जोडत आहे. आसामी भाषा ईशान्य भारतातील सुमारे २५ दशलक्ष लोक वापरतात. भोजपुरी सुमारे ५० दशलक्ष लोक वापरतात. कोकणीमध्ये भारतातील सुमारे २० दशलक्ष लोक वापरतात. संस्कृत ही गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे आणि आता आम्ही ती जोडत आहोत, असे गुगलच्या अभियंत्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा चीनच्या अडचणी वाढवणाऱ्या क्षेपणास्त्राची हिमालयाच्या कुशीत यशस्वी चाचणी!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.