‘औरंगजेबाला आम्हीच कबरीत टाकलं; तुमचंही तेच करणार’, राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

87

एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन औवेसी यांनी औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी डोकं टेकवल्यानंतर आता राज्यात राजकारण पेटले आहे. एमआयएमच्या नेत्यांवर भाजप, शिवसेना आणि मनसेचे नेते टीका करत आहेत. संजय राऊत यांनीही आता ओवैसी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले राऊत?

राऊत य़ांनी संतप्त प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, हे रितीरिवाज नाहीत वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असेच ओवेसी बंधूंना करायचे आहे. पण मी आज इतकेच सांगेन की, ज्या औरंगजेबच्या कबरी पुढे तुम्ही आज नमाज पढत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले, तुम्हाला कधीतरी त्याच कबरीत जावे लागेल, असा इशारा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ओवेसींना दिला.

(हेही वाचा – भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला आज होणार अटक)

तुमचेही लवकरच त्याच्यासारखे हाल होणार

राऊतांनी पुढे असेही म्हटले की, महाराष्ट्रावर चाल करणारा औरंगजेब २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळालं नाही. औरंगजेब सुफी संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले. छत्रपतींच्या मराठ्यांची त्यांच्यासोबत मोठी लढाई झाली आहे. आता हे ओवैसी आम्हाला आव्हान वगैरे देत आहेत. आम्ही ते स्वीकारतो. तुम्ही लोक औरंगजेबाचे भक्त आहात. त्यामुळे तुमचेही लवकरच त्याच्यासारखे हाल होणार असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.