नवाब मलिकांना जामीन नाहीच, पण उपचार घेता येणार

93

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. पण उपचार घेताना, रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्ताचा खर्चदेखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.

वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी जामीन अर्ज

खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी जरी देण्यात आली असली तरी उपचारादरम्यान, केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती.

( हेही वाचा: पुणे रेल्वे स्टेशनवर बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ; वाहतूक थांबवली )

…म्हणून जामिन मंजूर करावा

मलिकांच्या वकिलाने नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. मात्र, सक्तवसुली संचालनालयाने त्याला विरोध दर्शवला होता. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरुपी उपचार करण्याती इच्छा असल्याने, सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज मलिक यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.