अंत्यसंस्कारात शेती आणि झाडांचा जळाव वापरणार

93

मृतदेह दहनासाठी आता विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत असून आता अंत्यसंस्काराकरता ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ (Agro / Tree Waste Wood) यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. मात्र, आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून मुंबईतील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी १८ लाख ६० हजार किलो झाडांचे लाकूड वाचण्यासोबतच पर्यावरणपूरकता जपली जाणार आहे.

१४ स्मशानभूमीl लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर

मुंबई महानगरपालिकेच्या ज्या १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर पहिल्या टप्प्यात करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे, त्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० इतक्या मृतदेहांना अंतिम निरोप देण्यात येतो. ही बाब लक्षात घेतल्यास या ठिकाणी वर्षभरात साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो एवढ्या प्रमाणातील लाकडांचा वापर मृतदेह दहनासाठी होतो.

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

पारंपरिक दहन स्मशानभूमी, विद्युत स्मशानभूमी आणि ‘पी. एन. जी.’ अर्थात ‘पाईप्ड नॅचरल गॅस’ आधारित स्मशानभूमी यांचा समावेश होतो.आता पारंपरिक स्मशानभूमींपैकी १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

(हेही वाचा- “राज ठाकरेंची ‘पदवी’ ढापण्याचा प्रयत्न कराल तर…”, मनसेचा सेनेला इशारा)

प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे

‘ब्रिकेट्स बायोमास’ हे इंधन ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ (Agro / Tree Waste Wood) यापासून तयार करण्यात येते. शेती कच-यातील जो ‘एक तृतीयांश’ भाग फेकून देण्यात येतो, त्यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार करण्यात येतात. ज्यामुळे सदर कच-याचा अधिक चांगला उपयोग करण्याबरोबरच पर्यावरण-पुरकता देखील जपली जाते. प्रत्येक मृतदेह दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. मात्र, लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’ मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असते. या १४ स्मशानभूमींमध्ये ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे

या १४ स्मशानभूमीत होणार लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर

  • ‘डी’ विभागातील मंगलवाडी स्मशानभूमी,
  • ‘ई’ विभागातील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी,
  • ‘एफ उत्तर’ विभागातील गोयारी हिंदू स्मशानभूमी, ‘जी उत्तर’ विभागातील धारावी हिंदू स्मशानभूमी, ‘एच पश्चिम’ विभागातील खारदांडा हिंदू स्मशानभूमी,
  • ‘के पश्चिम’ विभागातील वर्सोवा हिंदू स्मशानभूमी, ‘पी उत्तर’ विभागातील मढ हिंदू स्मशानभूमी,
  • ‘आर दक्षिण’ विभागातील वडारपाडा हिंदू स्मशानभूमी,
  • ‘आर उत्तर’ विभागातील दहिसर हिंदू स्मशानभूमी, ‘एल’ विभागातील चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी,
  • ‘एम पूर्व’ विभागातील चिताकॅम्प हिंदू स्मशानभूमी, ‘एम पश्चिम’ विभागातील आणिक गाव हिंदू स्मशानभूमी,
  • ‘एस’ विभागातील भांडुप गुजराती सेवामंडळ स्मशानभूमी
  • ‘टी’ विभागातील मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.