राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरुन अभिनेत्री केतकी चितळे हीच्या अडचणीत वाढ होत आहे. केतकीने केलेल्या या पोस्टमधील कवितेत संत तुका म्हणे अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यावर आता देहू संस्थानाने आक्षेप घेतला असून केतकीचा निषेध केला आहे. तसेच यासंबंधी केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
(हेही वाचाः पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी)
देहू संस्थानाने घेतला आक्षेप
तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहेत. तुका म्हणे ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, त्यांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची ती एक स्वाक्षरी आहे. केतकीने केलेल्या या पोस्टमध्ये तुका म्हणे या शब्दांचा वापर करुन केलेले लिखाण हे वादग्रस्त असून, त्यातून विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याच नाही तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर अशाप्रकारे करू नये, असे पत्र देहू संस्थानाकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच असे लिखाण करणा-या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही देहू संस्थानाकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे.
(हेही वाचाः केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)
10 ठिकाणी गुन्हा दाखल
केतकी चितळे हिने केलेल्या पोस्टबाबत तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात तिचा निषेध करण्यात येत आहे. तिच्यावर महाराष्ट्रात एकूण 10 ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून, केतकीच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
(हेही वाचाः सुप्रिया सुळेंनी का मानले फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरेंचे ‘आभार’)
Join Our WhatsApp Community