गावाचा समावेश महापालिका हद्दीत होण्याची चाहुल लागताच अनेकांनी तातडीने बांधकामे करून ग्रामपंचायत नोंद जुन्या तारखेने करून घेतल्या. मात्र गुंठेवारीमधील बांधकामे अधिकृत करण्यासाठी हे बांधकाम 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे असल्याचे ‘गुगल मॅप’वरील नकाशात दाखविणे पीएमआरडीएने अनिवार्य केल्याने ग्रामपंचायत दफ्तरामध्ये नोंदी करण्याची चतुराई अंगलट आली आहे.
23 गावांबरोबरच उपनगरात अनधिकृत बांधकामे
हे बांधकाम अनधिकृत ठरवून पाडले जाण्याची टांगती तलवारही संबंधितांवर कायम राहणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांबरोबरच उपनगरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ही गावे पालिकेच्या हद्दीत असली, तरी बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडे आहे. पीएमआरडीए हद्दीतील निवासी झोनमधील आणि प्रारुप विकास आराखड्यामध्ये दाटीवाटीचे क्षेत्र (कन्झेस्टेट झोन) मधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 31 डिसेंबर 2020 पूर्वीची गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार आहे. यासाठी अटी, शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)
Join Our WhatsApp Community