रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्टची सफाई ‘रिमोट’द्वारे!

66

मुंबईतील रस्त्यालगतचे कल्वहर्ट आणि रेल्वेमधील कल्व्हर्टमधील पाण्यातील गाळ आणि तरंगता कचरा आजवर काढण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत, आता महापालिका रिमोट कंट्रोलद्वारे हा गाळ काढणार आहे. मनुष्यबळाचा वापर करत केवळ तरंगता कचरा काढला जात होता, परंतु दगड माती काढली जात नव्हती. पण आता  उघड्या कल्व्हर्टच्या बाहेर उभे राहून रिमोट कंट्रोलद्वारे मोठ्या आकाराचे दगड, माती, गाळ, विटा तसेच तरंगणारा कचरा आता यामुळे सहज काढता येणार आहे.

म्हणून यंत्राची खरेदी

मुंबईतील शहर आणि उपनगरांमधील मॅनहोल्स व जाळ्या साफ करण्यासाठी यंत्राचा वापर केला जात आहे. परंतु रस्ते आणि रेल्वेच्या कल्व्हर्ट साफ करण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रे या खात्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आता पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने  रिमोट कंट्रोल स्वींग लोडर यंत्र खरेदी केले जात आहे. हे यंत्र आकाराने छोटे असल्याने, रोड आणि रेल्वे कल्व्हर्टच्या बाहेर उभे राहून त्याद्वारे अत्यंत सोयीस्कर, सुरक्षित आणि सोप्या पध्दतीने गाळ काढला जाणार आहे. यामध्ये केवळ तरंगता कचरा नाही तर मोठ्या आकाराचे दगड,  माती,गाळ, विटा, लाकूड तसेच तरंगणारा कचरा अगदी सहजपणे बाहेर काढता येणार आहे.

( हेही वाचा: गुगल मॅपद्वारे अनधिकृत बांधकाम होणार ‘टार्गेट’ )

अगदी सहज कचरा काढता येणार

पावसाचे पाणी वाहून नेणारे नाले हे रेस्ते व रेल्वे रुळांखालून जातात. त्यामुळे या कल्व्हर्टमध्ये गाळ व कचरा मोठ्या स्वरुपात साचला जातो. सध्यस्थितीत कल्व्हर्टची सफाई मनुष्यबळाचा वापर करत केली जाते. परंतु मनुष्यबळाचा वापर करताना या कल्व्हर्टची सफाई करताना केवळ तरंगता कचरा काढला जातो. त्यामुळे कल्व्हर्टमधील गाळ पूर्णपणे काढणे शक्य होत नसून, या कल्व्हर्टची साफसफाई पूर्णपणे होत नाही. काही कल्व्हर्ट हे अडचणींच्या ठिकाणी असल्याने तिथे वाहनांच्या आधारे साफसफाई करता येत नाही. अशा ठिकाणी रिमोट कंट्रोलद्वारे साफसफाई करण्यासाठी स्वींग लोडर यंत्राचा वापर अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो,असे पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता एल. कमलापूरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.