विद्यार्थ्यांना आता पदवीधर होण्यासाठी पाच वर्ष शिकण्याची गरज नाही. नवीन आलेल्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने आता चार वर्ष पदवी अभ्यासक्रम लागू करण्याचा मसूदा तयार केला आहे. यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, दिव्यांगांना शिक्षण, नवसंशोधनाबरोबर बहुविद्याशाखीय दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर
आयोगाने शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांकडून या मसुद्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. यासाठी येत्या चार एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने केवळ पदवीधारक बनू नये, तर कालसुसंगत कौशल्ये त्याच्यामध्ये रुजली पाहिजेत, यादृष्टीनेही आवश्यक भर यात देण्यात आली आहे.
( हेही वाचा :महाराजांच्या पुतळ्यावर मनसेची हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी! )
‘असा’ असेल अभ्यासक्रम
या मसुद्यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांची शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक जडणघडण, त्यांच्यातील संवाद कौशल्याचा विकास, तसेच त्यांना विविध शाखांचा अभ्यास करण्याची मुभा यात देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमामध्ये मल्टीपल एन्ट्री, एक्झिट आणि फेर प्रवाशाची संधी असणार आहे. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तर त्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास पदविका, तीन वर्षांचा अभ्यासक्रम म्हणजे सहा सेमिस्टरनंतर पदवी, तर चार वर्षे म्हणजे आठ सेमिस्टर पूर्ण केल्यास ऑनर्स पदवी देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community