का होतेय राज्य सरकारवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी?

96

राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येत असतो. मात्र सरकारने या कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये आशा वर्कर्स ना रबरी लिंग देऊन पेचात पाडलं असल्याचे भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे.

आशा वर्कर्स सहन करताय तोंड दाबून बुक्यांचा मार

प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून ऑफ कॅमेरा सांगण्यात आलंय. मात्र हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिला समोर जायचं कस या विवंचनेत या आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळालं. आम्ही काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला साफ नकार दिला. त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार या आशा वर्कर्स सहन करत आहेत, असेही फुंडकर यांनी माध्यमांना सांगितले.

(हेही वाचा – पैसे नाहीत म्हणून सरकारने परीक्षाच केली रद्द!)

…तर राज्यात भाजप करणार आंदोलन 

महाविकास आघाडी सरकारने आशा वर्कर्सची थट्टा उडवली आहे. त्यांना रबरी लिंग दिले आहे, यावरून कुटुंब नियोजन आणि कुटुंब आयोजन करण्याच्या योजना राबिवण्याचे सरकारने आदेशित केले आहे. मात्र यावरून असे दिसतेय की, हे सरकार निर्लज्ज झाले आहे. त्यांनी महिलांसह आशा वर्कर्सची कुचंबना करणं सुरू केले आहे. तसेच यावरून त्यांनी स्त्रीत्वाचा अपमान केला असून हा विनयभंग आहे. यावेळी त्यांनी अशी मागणी केली की, या राज्य सरकारवर आणि संबंधितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा निर्णय घेतला अशा लोकांना अटक करण्यात यावं. जर असं झालं नाही तर राज्यात भाजप या विरूद्ध आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार आकाश फुंडकर यांनी सरकारला दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.