साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा आरोग्याला उत्तम म्हणून अनेकांनी गुळाचा आरोग्यदायी चहा असं म्हणत दुकान थाटली आहेत. या दुकानांमध्ये दिला जाणार गुळाचा चहा हा रसायनमुक्त आणि आरोग्यासाठी लाभदायक असं लिहिलेलं असतं. पण प्रत्यक्षात मात्र चहासाठी वापरले जाणारे हे गुळ रसायनयुक्त असल्याचे आढळले आहे. राज्यात 100 टक्के सेंद्रीय गुळाचे उत्पादन एकूण गुळाच्या उत्पादनाच्या तुलनेत एकही टक्का होत नाही. रसायनमुक्त गुळाचे प्रमाणही पाच टक्क्यांहून अधिक नाही. त्यामुळे चहासाठी जो गुळ वापरला जातो, तो रासायनिकच असतो.
अशी होतेय फसवणूक
गुळाला चांगला रंग यावा, तो काळसर दिसू नये म्हणून फॉस्फरस, सल्फरडाय ऑक्साईड आणि मागणीनुसार रंगांचा वापर केला जातो. ’साखर स्वस्त आणि गूळ महाग असल्याने गूळ तयार करताना साखरेची भेसळ केली जाते.
( हेही वाचा :मोदींचा मास्टर प्लॅन, लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील ‘हे’ प्रकल्प पूर्ण करणार! )
असा तयार करतात गुळ
कराड, शिराळा आणि कोल्हापूरमध्ये काही प्रमाणात रसायनमुक्त गूळ तयार होतो. पण, रसायने, रंग वापरून गूळ तयार करण्याचे प्रमाण जास्त आहे. हाच गूळ चहासाठी सर्रास वापरला जातो. सेंद्रिय गुळाला बाजार समितीत चांगला दर मिळत नाही, त्यामुळे तो फारसा तयार होत नाही. कमी रसायने घालून किंवा रसायने न घालता तयार केलेला गूळ सेंद्रिय म्हणून विकला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार रंग घालून केशरी, जिलेबी रंगाचा गूळही तयार केला जातो.
Join Our WhatsApp Community