कळव्यात मध्यरात्री गॅस सिलिंडरचा स्फोट, ४ जण जखमी

116

ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंग जवळ असणाऱ्या शिवशक्ती नगरात धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटात चौघे जण जखमी झाली आहे. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास कळव्यातील एका चाळीतील भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – एमआयएम – शिवसेना युती हे कोणाचं कारस्थान? )

चार जण जखमी असून ते 80 टक्के भाजले

ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी ठाण्यातील कळवा येथील गॅस एजन्सीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहे तर ते 80 टक्के भाजले आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यावर उपचार सुरू आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंगमागे शिवशक्ती नगरात भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडली. रविवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी 1 रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. काही ठराविक वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत सत्यम मंगल यादव (20), अनुराज सिंग (29), रोहित यादव (20) आणि गणेश गुप्ता (19) अशी जखमींची नावे आहेत. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे घराचे पत्रे देखील खाली पडले तसेच भितींनाही तडे गेले आहेत. रणजित सिंग असे एजन्सी मालकाचे नाव आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.