शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ‘ही’ शपथ

124

दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यंदाही राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, नेते अमितजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कित्येक मनसैनिकांनी हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात आणि मनसैनिकांना शपथ देखील दिली.

raj 1 1

सद्य स्थितीच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारा मजकूर

दरम्यान, येत्या काही काळात राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने राज ठाकरे शिवाजी पार्कमध्ये नेमके कोणत्या विषयांवर भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी शिवतीर्थ येथे शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत पक्षातर्फे शपथ देण्यात आली. या शपथेमधील मजकूर हा सद्य स्थितीच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करून जाणारा होता.

(हेही वाचा – तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसेकडून जंगी तयारी)

राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली ही शपथ

”आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसविण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसरून महाराष्ट्र सुराज्य व्हाव म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहिल, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुलं शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहरं, गावं, पारं, तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, तसेच आमच्या शेतकरी बंधु-भगिनींना त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल, कामगारांना न्याय मिळेल यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभीमानी, स्वावलंबी स्वराज्यांचे स्वप्न आम्हाला दिलं आहे, त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू, आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सौनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हे वचन देऊन आणि महाराज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.”

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.