मेळघाटच्या जंगलात कशासाठी लागले ‘पुष्पा’चे फलक

141

विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून सध्या विदर्भात तापमानाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. त्यामुळे जंगलात आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला आलेले पर्यटक नियमांची पायमल्ली करतात. त्यामुळे अशा पर्यटकांना धडा शिकविण्यासाठी वनविभाग आणि ग्राम विकास समितीने भन्नाट शक्कल लढविली आहे.

( हेही वाचा : पुण्यात ‘कशा’साठी लागतेय वाहनांची रांग! )

जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिये 

या उपक्रमात सिनेसृष्टीतील कलावंतांचा आधार घेत फलक तयार करून जनजागृती करण्यात येते आहे. यासह चालत्या गाडीतून सिगारेट फेकल्यास ५ हजाराचा दंड आणि ६ महिन्याची कैद अशी कारवाई करण्यात येईल असे फलक मेळघाटात लावण्यात आले आहेत. यासह पुष्पा चित्रपटातील डायलॉगच्या आधारे जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिये! अशा वाक्याने जनजागृती केली जात आहे. यासह वणव्याची माहिती देण्यासाठी वनविभागाने १९२६ क्रमांकाचा टोल फ्री क्रमांक देखील सुरू केला आहे. त्यामुळे वणवा लागल्याचे निदर्शनात आले तर त्वरित वनविभागाला संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

याबद्दल बोलताना सीमाडोह इथल्या वनरक्षक प्रीती लांजेवार म्हणाल्या की, सध्या वाढत्या तापमानामुळे जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते. तसेच काही पर्यटक सिगारेट ओढून रस्त्यातच त्याचे पेटती सिगारेट टाकतात, त्यामुळे आग लागण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच आम्ही या पद्धतीने जनजागृती करण्याचा पर्याय अवलंबला आहे असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.