कंगना, राणेंनंतर मोहित कंबोज BMC च्या निशाण्यावर; म्हणाले, “कुछ भी कर लो…”

97

अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाया सध्या लक्षवेधून घेत आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाईदेखील चर्चेत होती. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जुहू येथील अधीश बंगल्यासंदर्भात बीएमसीकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने राणे यांना आतापर्यंत तीन नोटीस पाठवल्या असून 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आता महापालिकेनं आता भाजप नेते मोहित कंबोज यांना देखील एक नोटीस पाठवली आहे.

Letter 2

पालिकेला आला अतिरिक्त बांधकामाचा संशय

महापालिकेने भाजप नेते मोहित कंबोज यांना कलम 488 नुसार एक नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात कंबोज यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिलेली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे, असा पालिकेला संशय आला आहे. 23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहे असा नोटीस मध्ये उल्लेख आहे.

(हेही वाचा – कलानगरची तुंबई रोखण्यासाठी वर्षाला साडेपाच कोटींची रखवाली)

कुछ भी कर लो मैं झुकूँगा नहीं

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी ट्वीट केले असून त्यांनी नोटीसची माहिती दिली आहे. माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करू शकले नाहीत म्हणून मुंबई महानगरपालिकेने माझ्या घरी नोटीस पाठवली आहे. कंगना रणौत असो किंवा नारायण राणे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु शकले नाहीत. आता घर तोडायचे काही असेल तर हरकत नाही. काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही असेही कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.