महामार्गांवरून प्रवास करणे आता स्वस्त होणार आहे. कारण सरकार एका निश्चित कालावधीमध्ये एक वेळेचा टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि सातत्याने महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आखण्यात आली आहे.
महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार नाही. सरकारची ही योजना पुढच्या ३ महिन्यांमध्ये लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सरकार येत्या ३ महिन्यांमध्ये देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार आहे. तसेच ६० किमीच्या अंतरामध्ये केवळ एकच टोल प्लाझा सुरू राहील. नितीन गडकरींनी सांगितले की, पुढच्या तीन महिन्यांमध्ये ६० किमीच्या अंतरामध्ये येणारे अन्य टोल नाके बंद केले जातील.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त)
केंद्र सरकार महामार्गावरील वाहतूक उत्पन्न वाढवण्यावर भर देणार
नितीन गडकरींनी टोल नाक्यांजवळ राहणाऱ्यांसाठीही महत्त्वाची घोषणा केली. टोल नाक्यांजवळ राहणाऱ्यांना टोल द्यावा लागणार नाही. त्यांच्यासाठी पास जारी केला जाईल. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच अधिकाधिक लोकांना टोल देऊन महामार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रेरित करता येईल. केंद्र सरकार सध्या महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान टोलमधून सवलत देण्यात यावी, अशी टोल नाक्याजवळ राहणाऱ्यांकडून सातत्याने मागणी करण्यात येणार होती. कारण त्यांना त्या मार्गावरून वारंवार प्रवास करावा लागे.
Join Our WhatsApp Community