रेल्वे सात दिवस राहणार बंद! कसा आणि कुठे असेल ब्लॉक?

138

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या बंगळुरू विभागात रुळांच्या नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने सात दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्या असून काहींचे मार्ग बदल करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उद्यान, हसन एक्स्प्रेसचा समावेश आहे.

जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणती एक्सप्रेस धावणार

सोलापूर मार्गावरून राजकोट-कोईमतूर एक्स्प्रेस २७ मार्चला गुंटकल, रेनिगुंटा, जोलारपेठा आणि तिरूपत्तूर मार्गे धावेल. ही गाडी या तारखेला गुती, अनंतपूर, धर्मावरम, हिंदुपूर, येलहंका, कृष्णराजपूरम आणि बंगारपेट स्थानकाला जाणार नाही. २७ मार्चला तुतीकोरीन-ओखा एक्स्प्रेस ही सेलम, जोलारपेठा, रेनिगुंटा आणि गुंटकल मार्गे धावेल. ही गाडी त्या तारखेला बंगारपेट, कृष्णराजपूरम, यलहंका हिंदपूर, धर्मावरम आणि अनंतपूर स्थानकाला जाणार नाही.

२३ ते २८ मार्च दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल-कोईमतूर एक्स्प्रेस ही गुंटकल, कडप्पा, रेनिगुंटा, जोलारपेठा आणि सेलम मार्गे धावेल. ती गाडी या तारखेला अनंतपूर, धर्मावरम, साईप्रशांत निलायम, हिंदुपूर, गौरीबिदनुर, बंगळुुरू पूर्व, बंगळुुरू कैंट, बंगळुुरू, होसूर आणि धर्मपुरी स्थानकाला जाणार नाही.

(हेही वाचा – पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन!)

कोईमतूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस २३ ते २९ मार्च दरम्यान सेलम, जोलारपेठा, रेनिंगुटा, कडप्पा आणि गुंटकलमार्गे धावेल. ही गाडी या तारखेला धर्मपुरी, होसूर, बंगळुुरू, बंगळुुरू कैंट, बंगळुुरू पूर्व, गौरीबिदनुर, हिंदुपूर साईप्रशांत निलायम, धर्मावरम आणि अनंतपूर स्थानकाला जाणार नाही.

२५ मार्चला ओखा- तुतीकोरीन एक्स्प्रेस ही गुटकंल, रेनिगुंटा, जोलारपेठा आणि सेलममार्गे धावेल. सदर गाडी या तारखेला अनंतपूर, धर्मावरम, हिंदपूर, यलहंका, कृष्णराजपूरम, आणि बंगारपेट आणि स्थानकाला जाणार नाही. त्याच दिवशी कोईमतूर- राजकोट एक्स्प्रेस ही जोलारपेठा, रेनिंगुटा आणि गुंटकल मार्गे धावेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.