जुलै महिन्यात विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेत या सदस्यांचा निरोप समारंभ झाला. त्यावेळी अजित पवार यांनी सभापतींच्याबाबतचा परिचय सभागृहाला करून दिला. तसेच अजित पवारांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत बोलताना प्रसाद लाड यांचे लाड कुणी केले आणि त्यांनी प्रसाद कुणाला दिला, हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
वेगाने एखाद्याच्या जवळ जाण्याची दरेकरांची कला
मनसेमधून आले आणि भाजपमध्ये इतके मोठे कसे झाले, असा प्रश्न भाजपमधील इतर जेष्ठ नेत्यांना देखील पडला असेल, असेही अजित पवार म्हणाले. वेगाने एखाद्याच्या जवळ जाण्याची कला प्रत्येकालाच जमत नसली तरी ती प्रविण दरेकरांनी इतर पक्षांना नाही तर किमान स्वपक्षीयांना तरी सांगावी, अशी मिश्किल टीप्पणी पवार यांनी दरेकरांवर बोलताना केली.
(हेही वाचा मांजरीने केली पुणेकरांची बत्ती गुल!)
संजय दौंड पेहलवान
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय दौंड यांनी शीर्षासन केले होते. पण याकरता नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे कुणीही उठसूठ शीर्षासन करु नये. एम.डी नावाचे सहकारी असेच शीर्षासन करतानाच गेले असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे कुणीही असे धाडस करु नये. खाली डोके वर पाय हे त्यांनी दाखवलेच आहे, असेही अजित पवार म्हणाले.
विधान परिषदेतील या सदस्यांचा कार्यकाळ संपला
सभापती रामराजे निंबाळकर, रविंद्र फाटक, प्रविण दरेकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यात संपत आहे.
Join Our WhatsApp Community