तापमानवाढीच्या फे-यात राज्यातील उन्हाळा आणि हिवाळ्यात तापमानवाढ दोन ते तीन अंशाने होणार असल्याचा इशारा सेंटर फॉर सायन्स, टेक्लोलॉजी एण्ड पोलिसी या संस्थेने दिला आहे. गेल्या तीस वर्षांच्या तुलनेत २०५०पर्यंत प्रदूषणाची वाढती तीव्रता लक्षात घेत १ ते २ अंश सेल्सिअसने वाढवलेले असेल. परिणामी, पावसाचे दिवस आणि प्रमाणही वाढेल,अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
( हेही वाचा : …तर तुमचे व्हॉट्सअॅप होईल बॅन! )
पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना दिलासा मिळेल, मात्र बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामावर होईल, अशी भीती पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली. राज्यातील हवामान बदलांवर झालेला अभ्यास सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी एण्ड पोलिसीने या संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या १९९१ आणि २०१६ सालाच्या ३० वर्षांच्या अभ्यासातून अंदाज वर्तवला.
२०५० पर्यंतचे दुष्परिणाम –
- २०५० पर्यंत तापमान २ अंशाने वाढ होईल.
- उन्हाळ्यात ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढ होईल.
- हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होईल.
- उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानवाढ होईल.
तापमान वाढीचे जिल्हे (अपेक्षित तापमानवाढ – अंश सेल्सिअसमध्ये)
भंडारा – १.१, अकोला – १.३, अमरावती – १.६, औरंगाबाद – १.१, बीड-१.२, धुळे – १.१, गोंदिया – १.१, हिंगोली – १.२, जळगाव – १.३, लातूर – १.४, नागपूर – १.१, नंदूरबार – १.६, उस्मानाबाद – १.४, वर्धा – १.१, वाशीम – १.२, यवतमाळ-१.१
सर्वाधिक तापमान वाढीचे जिल्हे (अपेक्षित तापमानवाढ – अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला – २.५, अमरावती – २.९, औरंगाबाद – २.९, भंडारा – २.६, बुलडाणा – २.३, धुळे – २.२, गोंदिया – २.१, हिंगोली – २.२, जळगाव – २.५, जालना – २.७, नागपूर – २.२, नंदूरबार – २.५, नाशिक – २.४, वर्धा – २.१, वाशिम – २.३
कमी तापमान वाढीचे जिल्हे
गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान कमी होईल.
पावसाचे दिवस वाढणार –
- सर्वच जिल्ह्यांत पावसाचे दिवस ३ ते ९ दिवसांनी वाढतील. जिल्हा (अपेक्षित दिवस) वाशीम – ९, जालना – ८,
- चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा – ६
- अकोला, बुलडाणा, नंदूरबार, उस्मानाबाद, पुणे, सांगली, वर्धा – ५
- पूर्व ते पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण १ ते २९ टक्क्याने पूर्व-पश्चिम दिशेला वाढत जाईल.
- गोंदियात १ टक्के तर पुण्यात २९ टक्के , चंद्रपूरात १५ टक्के वाढ होईल.
सरासरी पावसाच्या बाबतीत सर्वाधिक पावसाचे जिल्हे
अकोला – १७-२५ टक्के, भंडारा – १७-२० टक्के, बुलडाणा, चंद्रपूर – १४ टक्के, नाशिक – १५-१६ टक्के, पुणे – २५-२९ टक्के, रत्नागिरी – १७ ते २० टक्के, सातारा १९-२४ टक्के, सोलापूर – १५-१९ टक्के, वाशीम- १८-२१ टक्के आणि यवतमाळ – १७-१९ टक्के
खरीप हंगामात पावसाची अनियमितता १० टक्के वाढेल. यात औरंगाबाद, रत्नागिरी आणि मुंबई विभागाचा समावेश असेल. हंगामापेक्षा अनेक जिल्ह्यांत ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण आणि दिवस वाढेल. सर्वाधिक वाढ गडचिरोलीत १९ ते २२ टक्के, गोंदियात ३३ ते ४३ टक्के, नंदुरबारमध्ये ५७-८१ टक्के, उस्मानाबादमध्ये १८-३२ टक्के, पालघरमध्ये १९-३१ टक्के, पुण्यात २०-३२ टक्के, रायगडमध्ये २७-४१ टक्के, रत्नागिरीत ३९ टक्के, सांगलीत २३-३३ टक्के, ठाण्यात २५.४१ टक्के, वर्ध्यात ३९-४२ टक्क्यापर्यंत होईल, असा अंदाज आहे.
( हेही वाचा : पुणेकरांच्या आरामदायी प्रवासासाठी केंद्राचे ८० कोटी! )
अति पावसाचा धोका –
२०२१ – २०५० पर्यंत भंडारा जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात १ ते ५ दिवस अतिपावसाच्या घटना घडतील. एका दिवसांत तब्बल ५१ ते १०० मिमी पाऊस होईल. २० जिल्ह्यांमध्ये अतिपावसाच्या २ तर ८ जिल्ह्यांत १ घटना घडेल.
जिल्हानिहाय अतिपावसाचे दिवस –
- सिंधुदुर्ग – ५, बुलडाणा – ४,
- हिंगोली, लातूर, बीड, सोलापूर आणि औरंगाबाद – ३
- राज्यभरात १०० मिमीपर्यंत पावसाचे २ ते ८ दिवस असतील. सिंधुदुर्गात ८, बुलडाणा, हिंगोलीत ५ दिवस १०० मिमी पावसाचे असतील. अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर आणि वाशीम येथे प्रत्येकी ४ दिवस १०० मिमी पावसाचे असतील. १५ जिल्ह्यांत ३ दिवस १०० मिमी पाऊस राहील. ८ जिल्ह्यांत २ दिवस १०० मिमी पाऊस राहील.
अतिपावसाचा कोणत्या जिल्ह्यांना फायदा होईल
धुळे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे
अतिशय मोठ्या पावसाच्या घटना –
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात १ ते २ दिवस अतिपावसाचे दिसून येतील. बुलडाणा, हिंगोली, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, रायगड, सांगली, सातारा या प्रत्येक जिल्ह्यात २ घटना अतिपावसाच्या नोंदवल्या जातील. हिंगोली, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद. परभणी, रायगड, सांगली, कोल्हापूर, वाशीम, वर्धा, मुंबईमध्ये अतिपावसाचे ३ दिवस राहतील. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम थेट अतिपावसाच्या स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यात तीनदा दिसून येईल. १६ जिल्ह्यांमध्ये २ तर ८ जिल्ह्यांमध्ये १ दिवस अतिपावसाचा दिसून येईल.
Join Our WhatsApp Community