स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येतोय चित्रपट! कोण आहे नायक?

87

सशस्त्र क्रांतीकारकांचे मुकुटमणी वीर सावरकर यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे ही चित्रपट बनवत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाने येणा-या चित्रपटात वीर सावरकर यांची भूमिका कोण साकारणार, याविषयी उत्सुकता ताणलेले होती. ही उत्कंठा अखेर संपलेली आहे. या चित्रपटात वीर सावरकर यांच्या भूमिकेत राजदीप हुडा दिसणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि संदीप सिंग करणार आहेत, तर दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. रणदीप हुडा यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरस करत नव्या प्रोजेक्टची माहिती दिली. तसेच रणदीप यांनी त्यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो देखील शेअर केला आहे. ‘कुछ कहानियाँ बताई जाती है और कुछ जी जाती हैं! #SwatantraVeerSavarkar यांच्या बायोपिकचा भाग बनल्याबद्दल मी खूप कृतज्ञ, उत्साहित आणि सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे’, असे कॅप्शन देत रणदीपने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाचे भगतसिंगांनी केले होते पुनर्प्रकाशन)

काय म्हणाले रणदीप हुडा?

28 मे 1883 रोजी जन्मलेले वीर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होतेच, पण ते एक कुशल राजकारणी, वकील, लेखक, साहित्यिक, समाजसुधारक होते. त्यामुळे वीर सावरकरांची भूमिका पडद्यासमोर साकारण्याचे मोठे आव्हान रणदीप हुडा यांच्यासमोर असणार आहे. वीर सावरकर हे प्रभावशाली होते, मात्र त्यांच्याविषयी गैरसमज पसरले होते, तेही नष्ट झाले पाहिजे, हे चित्रपटाच्या माध्यमातून समोर आले पाहिजे. सरबजीतनंतर संदीपसोबत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी काम करताना मला आनंद होत आहे. ही भूमिका साकारणे आव्हानात्मक असेल, असे रणदीप हुडा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.