दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनने आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे केले. आरोग्य क्षेत्राची गरज तसेच मागणी वाढलेली असताना बालरोगतज्ज्ञांचा जवळपास ७० टक्के बिझनेस ठप्प झाल्याचे पाहायलाम मिळाले. हवेतील घटत्या प्रदूषणामुळे नवजात बालकांमध्ये आढळून येणारा दमा तसेच लहान बालकांमधील संसर्गाची समस्या निम्म्याहून जास्त घटली. परिणामी, बालरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात लहान मुलांची दैनंदिन फेरीत ७० टक्के घट झाल्याची माहिती पुण्याच्या पल्मोकेअर रिसर्च एण्ड एज्युकेशन फाऊंडेशनचे संचालक डॉ संदीप साळवी यांनी दिली.
( हेही वाचा : उन्हाळा सतावणार आणि पावसाळाही लांबणार )
कोरोनाउपचारांत फुफ्फुसांच्या आजारांबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असली तरीही या आजारांमुळे निर्माण होणा-या आरोग्याच्या समस्येबाबतही लोकांमध्ये खूप चांगली जनजागृती झाली. पहिल्या आणि दुस-या लाटेतही फुफ्फुसांच्या आजारांच्या लोकांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास मोठी समस्येला तोंड द्यावे लागते. परंतु लॉकडाऊन काळातील गर्भवती महिलांच्या प्रसूतीकाळापर्यंत जवळपास जीवनमान ठप्पच होते. परिणामी हवेचा दर्जाही चांगलाच राहिल्याचे, कित्येक हवामान तज्ज्ञांच्या नोंदणीत आढळले. परिणामी, नवजात बालकांचे फुफ्फुस सशक्त दिसून आल्याची माहिती डॉ साळवी यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून वाढत्या हवेच्या प्रदूषणात नवजात बालके आणि लहान मुलांचे फुफ्फुस कमकुवत दिसून येत आहे. मात्र कोरोनाकाळात जन्मलेल्या मुलांमध्ये सुदैवाने फुफ्फुस सशक्त असल्याचे दिस्लयाचे डॉ साळवी म्हणाले.
अगोदर लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे अस्थमा अटॅक येत असल्याचा कित्येकांचा समज होता. परंतु लॉकडाऊनमुळे हवेचे प्रूदूषण घटताच लहान मुलांमधील अस्थमा ब-यापैकी नियंत्रणात आला. परिणामी, लहान मुलांनाही हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमा तसेच श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याचे सिद्ध झाल्याचे डॉ साळवी म्हणाले.
व्हायरल इन्फेक्शनही कमी झाले
बालरोगतज्ज्ञ डॉ अमोल अन्नदाते यांनी कोरोनाकाळात लहान बालकांचे आरोग्य सुधारल्याच्या दावा केला. लहान मुलांमध्ये केवळ अस्थमाच नव्हे, तर सर्दी-खोकला अशा आजारांवरही नियंत्रण आले. मुलांमधील गॅस्ट्रोच्या आजाराचे प्रमाण कमी झाले. लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कित्येक पालकांनी आपल्या मुलाला फ्लूप्रतिबंधात्मक लसीकरणही केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रौढांमधील दमाही नियंत्रणात
पहिल्य लॉकडाऊन काळात ब-याच रुग्णांचा अस्थमा नियंत्रणात आल्याची माहिती वांद्रे य़ेथील लिलावती रुग्णालयातील चेस्ट फिजिशीयन डॉ संजीव मेहता यांनी दिली. डॉ मेहता यांच्याकडे नियमित तपासणीला येणारे लहान मुले तसेच प्रौढ रुग्ण बराच काळ गायब होते. त्यांची विचारपूस केली असता अस्थमा नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली, असेही डॉ मेहता म्हणाले.
Join Our WhatsApp Community