रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे सांगितले की, रेल्वेमध्ये एंट्री लेव्हलची देशभरात एकूण 1 लाख 49 हजार 688 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची निर्मिती आणि भरतीची निरंतर प्रक्रिया सुरू आहे. रिक्रुटिंग एजन्सीद्वारे आणि रेल्वेद्वारे इंडेंट सबमिट करून ऑपरेशनल आवश्यकतांनुसार रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
कुठे किती पदं रिक्त?
एकूण 17 विभागीय रेल्वेमध्ये एकूण 1,49,688 प्रवेश स्तरावरील जागा रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वेमध्ये सर्वाधिक 19 हजार 183 एंट्री लेव्हल पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेची दक्षिण मध्य रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 17 हजार 22 पदे रिक्त आहेत. तर पश्चिम रेल्वे 15 हजार 377 रिक्त पदांसह तिसर्या क्रमांकावर आहे आणि 11 हजार 101 रिक्त पदांसह पश्चिम मध्य रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
(हेही वाचा – लॉकडाऊनने बुडवला बालरोगतज्ज्ञांचा बिझनेस)
अशी केली जाते रिक्त पदांवर भरती
रेल्वे असणारे रिक्त पदे निर्माण करणं आणि त्यावर भरती करणं ही एक सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. या रिक्त जागा रिक्रुटिंग एजन्सीद्वारे रेल्वेद्वारे इंडेंट सबमिट करून ऑपरेशनल आवश्यकतांनुसार भरल्या जातात, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले आहे. रेल्वेमधील गट C आणि D पदांकरता उमेदवार निवडून रेल्वे भरती मंडळे आणि विभागीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेलद्वारे भरली जातात. या एजन्सीद्वारे योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर रिक्त जागा अधिसूचित केल्या जातात आणि वेळोवेळी भरल्या जातात, अशीही माहितीदेखील त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community