आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून मुंबईतून सुरू होणार आहेत. मात्र यंदाच्या आयपीएल मॅचवर अतिरेक्यांचं सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या इशारा तपास यंत्रणेकडून देण्यात आलेला आहे. अतिरेक्यांकडून वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॉटेल परिसराची रेकी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने राज्याच्या तपास यंत्रणेने मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहून या ठिकाणाची तपासणी करण्याची सूचना दिली आहे.
सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 26 मार्च रोजी आयपीएल क्रिकेटचा पहिला सामना होणार आहे आहे. मुंबईत होणाऱ्या सामन्याची पूर्ण तयारी झालेली असून खेळाडूंना राहण्याची सोय दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. आयपीएलचे सामने अतिरेकी संघटनेच्या रडारवर असून काही अतिरेक्यांनी खेळाडू वास्तव्यास असणारे हॉटेल आणि त्या मार्गाची रेकी केल्याची गोपनीय माहिती राज्यातील तपास यंत्रणेला मिळाली आहे. अतिरेक्यांकडून या सामन्यांदरम्यान घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा यंत्रणेला सुरक्षेसंदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत.
(हेही वाचा – एसटी संपकऱ्यांचा संतप्त सवाल, … तर मग वेळ का मागितला?)
सुरक्षा यंत्रणेला दिल्या अशा सूचना
खेळाडू थांबलेल्या हॉटेल्सची तसेच त्यांच्या खोल्याची नीट पाहणी करणे, या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करणे, तसेच अनोळखी व्यक्तींना खेळाडू जवळ जाऊ देऊ नये, त्यासोबत खेळाडू राहत असलेल्या ठिकाणांचा नकाशा तयार करून कडेकोड बंदोबस्ताची तयारी करण्यात यावी. खेळाडूंच्या बसला एस्कॉर्टसाठी मार्क्समन अथवा कॉम्बैट वाहन नेमण्यात यावे, या प्रकारच्या सूचना सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community