काय सांगताय! देशाच्या ‘या’ विमानतळावर आहे चक्क ‘दर्गा’

98

तुम्हाला देशाच्या एका विमानतळावर चक्क ‘दर्गा’ असल्याचे सांगितले जात आहे. हे खूप आश्चर्यकारक वाटत असले तरी हे खरे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दर्गा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 मध्ये आहे. याला पीर बाबाचा दर्गा असेही म्हणतात. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मोफत बससेवाही चालवली जाते. दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ अतिसुरक्षित आहे. हे विमानतळ आणि येथील संपूर्ण परिसर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अखत्यारीत असून जिथे चोवीस तास कडक पहारा ठेवला जातो, या अतिशय सुरक्षित आणि संवेदनशील ठिकाणी एक समाधी देखील आहे, जी टर्मिनल-2 च्या आत असून तिथे जाणारी व्यक्ती ही धावपट्टीच्या अगदी जवळ असते.

peer baba 1

ही समाधी कोणाची आणि ती कशी आली?

विमानतळ परिसरात असलेल्या समाधी बडे बाबा (बाबा कालेखन) आणि छोटे बाबा (बाबा रोशन खान) यांच्या आहेत. 1540 मध्ये हुमायूनचा पराभव केल्यानंतर शेरशाह सूरीने दिल्लीवर राज्य केले असे म्हटले जाते. त्याच काळात काले खान नावाचा एक सुफी होता आणि विमानतळाच्या धावपट्टी आणि ब्लू डार्ट हँगरमध्ये असलेला हा दर्गा त्याच खानचा असावा. हे विमानतळ अधिक सुरक्षित भागात कसे बांधले गेले किंवा विमानतळ विस्तारीकरणात का स्थलांतरित केले गेले नाही, हा मोठा प्रश्न आहे. तसे, या दर्ग्याच्या काळजीवाहूंनाही त्या समाधीच्या बांधकामाबद्दल माहिती नाही.

(हेही वाचा – एसटी संपकऱ्यांचा संतप्त सवाल, … तर मग वेळ का मागितला?)

विमानतळात दर्ग्यावर अर्पण करण्याकरता चादर, फुलांची दुकानं

देशातील कोणत्याही विमानतळ परिसरात सामान्य दुकाने क्वचितच आढळतात, परंतु इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 वर फुल आणि चादरची दुकाने रांगेत असल्याचे दिसत आहेत. दर्ग्यासाठी, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) गुरुवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत कॉर्गो कॉम्प्लेक्स ते टर्मिनल-2 पर्यंत मोफत बस पुरवते. त्या परिसरातून चालत गेल्यावर लोक नमाजसाठी आत जातात. दर्गा धावपट्टी क्रमांक 10/28 अगदी जवळ आहे, समोर विमाने दिसतात. दिल्ली विमानतळाची भव्यता आणि संवेदनशीलता पाहता, सुरक्षा हा येथील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे सांगितले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.