रेल्वे स्थानकावरच प्रवाशांचा होतोय थकवा दूर, जाणून घ्या मध्य रेल्वेची अनोखी सुविधा!

104

मध्य रेल्वेने गुरुवारपासून मुंबईच्या उपनगरीय स्थानकांवर सलून सेवा सुरू केली आहे. याची सुरुवात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकापासून करण्यात आली असून पार्लरसारख्या सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत.  २४ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे. हे सलून सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांचा दिवसभराचा थकवा स्थानकात येताच नाहीसा होणार असला तरी त्यासाठी त्यांना आपला खिसाही मोकळा करावा लागणार आहे.

पर्सनल केअर सेंटर

स्पा-सलून, पर्सनल केअर सेंटर याशिवाय आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्य आणि कॉस्मेटिक उत्पादने विकण्याची सुविधाही दिली जाईल. याशिवाय मसाज खुर्चीच्या मदतीने बॉडी मसाज, फिजिओथेरपी, हेअर कट, शेव्हिंग आणि फेशियल आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सलूनला सीएसएमटी इमारतीसारखाच लूक दिला जाणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांनाही या सलून-स्पा सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

( हेही वाचा: मविआ म्हणजे महाविनाश आघाडी! देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल )

प्रथमच ही सुविधा

रेल्वेद्वारे महसूल वाढीसाठी हा  उपक्रम राबवण्यात आला आहे. सीएसएमटीवर प्रवाशांच्या रहदारीच्या ठिकाणी पर्सनल केअर सेंटर डिझाईन केले गेले जे गुरुवारपासून लोकसेवेत आहे. सीएसएमटी आणि  एलटीटी स्थानकातही ही सुविधा देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर प्रथमच ही सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.