उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने संमती दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावर लवकरच तज्ज्ञांची एक टीम तयार केली जाईल आणि राज्यभर समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे धामी यांनी स्पष्ट केले.
ठरलं देशातील पहिलं राज्य
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पुष्कर सिंह धामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. धामी यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी 24 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच त्यांनी जनतेला दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण केले आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 70 पैकी 47 जागा जिंकल्या होत्या. धामी यांच्या घोषणेनंतर समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरेल.
( हेही वाचा :“मविआ म्हणजे खाऊंगा भी, और…”, अमृता फडणवीसांची खरपूस टीका )
समान नागरी कायदा आवश्यक
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी म्हणाले की, आपल्या राज्याला दोन आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहेत. अशा परिस्थितीत उत्तराखंडमध्ये सर्वांसाठी समान कायदा असणे आवश्यक आहे. समाज आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करू असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Join Our WhatsApp Community