दहशतवादी हल्ल्याच्या कटाचं बुलढाणा कनेक्शन; एकाच वेळी NIA चे या दोन ठिकाणी छापे

72

हेरगिरीच्या संशयावरुन एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ने मोठी कारवाई केली आहे. जानेवारी 2020 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये दाखल झालेल्या दहशतवादाशी संबंधीत गुन्ह्याचा तपास एनआयए करत आहे. या प्रकराणात एनआयएने गुजरातच्या ग्रोधा आणि महाराष्ट्रातील बुलडाणा परिसरात एकाच वेळी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा आणि गुजरातमधील गोध्रा येथे एनआयएने रात्री उशीरा हे छापे टाकले आहेत. दहशतवादी हल्ल्यांबाबत संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरांचा या कृत्यात सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. गुजरातमधील ग्रोधा आणि बुलडाणामध्ये एकाच वेळी छापे मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा – “केवळ घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकार नव्हे तर…”)

पुढील कारवाई सुरू

यात काही संशयास्पद सिम कार्ड, संशयास्पद कागदपत्रे व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील जप्त केले आहे. दरम्यान, अजून एनआयएची कारवाई पूर्ण झाली नसून पुढील कारवाई होत आहे. त्यामुळे या कारवाईनंतर आणखी कोणते महत्त्वाचे धागेदोरे एनआयएच्या हाती लागणार का? याकडे साऱ्याचं लक्ष लागून आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.