टॅक्सची बचत करायचीय? तर ‘या’ खास टिप्स तुमच्यासाठी!

150

चालू वर्षातील टॅक्स भरण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत. 31 मार्चपूर्वी तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. तुम्हाला भरावा लागणारा टॅक्स जर का कमी करायचा असेल, तर या काही खास टिप्स तुमच्यासाठी, या टिप्सचा अवलंब करुन तुम्ही काही प्रमाणात तुमच्या टॅक्सची बचत करु शकता.

अशी मिळवा सूट

आयकर विभागाच्या कलम 80 सी नुसार, 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध करण्यात आली आहे. ही सूट आणखी वाढवण्यासाठी तुम्ही कलम 80 सीसीडी (1बी) चाही लाभ  घेऊ शकता. यामध्ये ही सूट 2 लाखांपर्यंत वाढू शकते. ही सूट मिळण्यासाठी तुम्हाला पीपीएफ आणि एनपीएससारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. कलम 80 डी अंतर्गत तुम्ही आरोग्य विम्यासाठी प्रीमियमचा दावाही करु शकता. या पाॅलिसीमध्ये कोणाचा समावेश आहे, त्याचे वय काय, त्यानुसार 80 डी अंतर्गत टॅक्समधून सूट मिळते. त्यामुळे 25 हजार, 50 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा कर बचत करु शकता.

( हेही वाचा: आता मदरशांमधून ऐकू येणार ‘राष्ट्रगीत’! वाचा राज्याचा मोठा निर्णय )

चॅरिटीवर असते सूट

मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवरही तुम्हाला टॅक्स सवलत मिळू शकते. कलम 80 ई अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर टॅक्स सूट मिळू शकते. या सवलतीचा लाभ मुलांपासून पालकांना घेता येऊ शकतो. यावर तुम्ही हवी तितकी सूट मागू शकता. याशिवाय तुम्ही चॅरिटी करत असाल, तरीही टॅक्समध्ये सूट मिळू शकते. चॅरिटीसाठी काही देणग्यांवर 100 टक्के, तर काहींवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. अशा प्रकारे या काही टिप्सचा अवलंब करुन तुम्ही  टॅक्सची बचत तुम्ही करु शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.