तुमची मुलगी काय करते? अल्पवयीन मुलींना देहव्यापारात आणणारे रॅकेट उध्वस्त

78

मोलमजुरी करणारे आई वडील कामावर गेल्यावर मुले घरी एकटे काय करतात? याची कल्पना नसणाऱ्या पालकांनो वेळीच सतर्क व्हा! नाही तर तुमच्या मुलांसोबत देखील असा प्रकार घडू शकतो. पोटात दुखू लागल्याने मोठी बहिण तिला डॉक्टरांकडे घेऊन आली होती, डॉक्टरांनी तपासून ती गर्भवती असल्याचे सांगताच मोठ्या बहिणीला धक्काच बसला. डॉक्टरांनी देखील मुलगी अल्पवयीन असल्यामुळे ताबडतोब ही बाब पोलिसांना कळवली आणि काही वेळातच निर्भया पथक रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी तपासून औषधे दिल्यानंतर पोलीस पीडित आणि तिच्यासोबत असलेल्या बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात आले.

( हेही वाचा : संदीप देशपांडे म्हणतात… बेस्टला लुटतेय वीरप्पन गॅंग! )

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पूर्व उपनगरातील एका पोलीस ठाण्यात पीडितेला आणल्यानंतर तिच्याकडे महिला पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पूर्व उपनगरात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांना देहविक्री व्यवसायात लोटणारे एक रॅकेट काम करीत असून पीडित तरुणीला देखील याप्रकारे फसवून तिला देहविक्रीसाठी दक्षिण मुंबईतील एका लॉज मध्ये एका पुरुषासोबत पाठविण्यात आले होते अशी माहिती समोर आली. पोलिसांनी मुलीच्या जबाबानंतर शारीरिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एका महिलेसह लॉज मालक आणि व्यवस्थापक या तिघांना अटक करण्यात आली. तसेच गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना हेरून त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या १७ वर्षाच्या मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गरीब कुटुंबातील चार अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीत आणखी काही जण सामील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त

पूर्व उपनगरातील १६ ते १८ वर्षाचे तरुण या रॅकेटमध्ये सामील आहे, ही मुले झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना गाठून त्यांच्यासोबत मैत्री करायचे, आणि त्यांना विशिष्ट जीवनशैलीची सवय लावण्यासाठी त्यांच्यावर पैसे खर्च करायचे, नंतर जेव्हा मुलींना पैशाची गरज भासत असे तेव्हा आरोपी महिला त्यांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तपासात टोळीने चार अल्पवयीन गरीब कुटुंबातील मुलींना देहव्यापारात लोटले असून पीडित मुलीची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.