मोबाईल डेटा लवकर संपतोय? तर करा हे उपाय

133

मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. अनलिमिटेड इंटरनेट सुविधेमुळे अलिकडे प्रत्येकजण मोबाईलमध्ये विविध अ‍ॅप्स , सोशल मिडियाचा वापर करण्यात व्यस्त असतो. अशावेळी युजर्स मोबाईल डेटा संपला की, हैराण होतात. याच मोबाईल डेटाची बचत करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

( हेही वाचा : हृदय विकाराच्या झटक्याने ‘पुतीन’चा मृत्यू! )

करा हे उपाय…

  • डेटा सेव्ह करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या काही सेटिंग बदलाव्या लागणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपमधील ऑटो डाऊनलोड ही सेटिंग बंद केल्याने तुमच्या डेटाची बचत होऊ शकते. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज आणि डेटा त्यानंतर ऑटो डाऊनलोडमध्ये नो मिडियावर पर्याय निवडा.
  • स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हर नावाचा पर्याय असतो. हा पर्याय सुरू ठेवल्याने स्मार्टफोनमधील डेटा वेगाने संपणार नाही. आणि तुमच्या डेटापॅक मधील १.५ जीबी डेटा देखील दिवसभर पुरेल.
  • अलिकडे युजर्स सतत मोबाईल फोनचा वापर करत असतात त्यामुळे स्मार्टफोनवर डेटा लिमिट सेट करा. डेटा कंट्रोल, डेटा सेव्ह, डेटा लिमिट असे पर्याय स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असतात याची निवड केल्यामुळे तुमचा डेटापॅक लवकर संपणार नाही.
  • स्मार्टफोन सेटिंग पाहिल्यावर तुमचा कोणता अ‍ॅप सर्वाधिक डेटा युज करतो याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. या अ‍ॅप्स संदर्भात माहिती मिळाल्यावर तुम्ही डेटा वापरण्याचे नियोजन करू शकता.
  • मोबाइल डेटा लवकर संपण्यामागे ऑटो अपडेट देखील एक महत्वाचे कारण असू शकते. त्यामुळे प्ले स्टोरमधून ऑटो अपडेट पर्याय बंद करा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.