महागाईचा झटका! तब्बल ८०० पेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ

127

येत्या एप्रिल महिन्यापासून भारतात तब्बल आठशेपेक्षा अधिक औषधांचे भाव वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ही दरवाढ ठोक खरेदी विक्रीच्या आधारावर करण्यात येणार आहे. मात्र तरी देखील या दरवाढीचा फटका हा किरकोळ खरेदीदारांना देखील बसणार आहे. आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहेत. जवळपास ८०० औषधांचे दर १० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं देखील आता महाग होणार आहे.

(हेही वाचा – हिजाब वाद: विरारच्या लॉ कॉलेजच्या प्राध्यापिकेला न्यायालयाचा निर्णय मान्य नाही?)

कोणत्या औषधांच्या दरात होणार वाढ

घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीने (एनपीपीए) सांगितले असून उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधे महागणार आहेत. वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून शेड्यूल्ड औषधांच्या किमतींमध्ये १०.७ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल्ड प्रकारातील औषधांचा समावेश हा अत्यावश्यक औषधांमध्ये होतो. या औषधांवर सरकारचे नियंत्रण असते, परवानगीशिवाय या प्रकारातील औषधांचे दर वाढवता येत नाहीत. शुक्रवारी ‘एनपीपीए’च्या वतीने औषधांच्या किमतींबाबत एक नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

म्हणून वाढले औषधांचे दर

औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनुष्यबळाची किंमत देखील वाढली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढला आहे. पूर्वीच्या दरात औषधांची विक्री करणे परवडत नसल्याने औषधांचे दर वाढवण्याची मागणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.