कंबोज म्हणतात, चहल यांची अमेरिकेतही संपत्ती!

66

महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड मारल्यानंतर यासंदर्भात महापालिका आयुक्त म्हणून इक्बालसिंह चहल यांना समन्स जारी केले असतानाच भाजपचे मुंबई प्रदेशचे सरचिटणीस मोहिम कंबोज-भारतीय यांनी त्यांच्यावर अमेरिकेत संपत्ती खरेदी केल्याचा आरोप केला आहे. चहल यांची आयकर विभागाच्या माध्यमातून चौकशी केली जात असून लवकरच याबाबतची मोठी कारवाई केली जाईल,असे संकेतही मोहित भारतीय यांनी दिले आहे.

( हेही वाचा : दहावी-बारावीचे निकाल उशिराने? कारण काय वाचा… )

आयकर विभागाची सखल चौकशी 

मोहित भारतीय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. आयकर विभागाच्या तपासणीमध्ये आतापर्यंत ३०० कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीची माहिती समोर आली आहे. या भ्रष्टाचारात महापालिका आयुक्त म्हणून इक्बालसिंह चहल यांचाही मोठ्याप्रमाणात सहभाग असून त्यामुळेच आयकर विभागाचे पथक याची सखोल चौकशी करत आहे.

यासंदर्भात चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आयकर विभागाने आपल्याला नोटीस पाठवली होती, याची स्पष्टीकरण देत यासंदर्भात महापालिकेच्यामाध्यमातून चालू असलेल्या विकास प्रकल्पांची माहित त्यांनी मागितली होती. त्यानुसार त्यांनी बजावलेल्या नोटीसनुसार उत्तर दिले आहे. परंतु ते आयकर विभागाच्या कार्यालयात गेले नाही आणि नाही त्यांची आयकर विभागाने वैयक्तिक चौकशी केली.

कारवाईची मागणी

महापालिकेच्या एच पश्चिम आणि के पश्चिम विभागाच्या माध्यमातून मोहित भारतीय यांच्या निवासस्थांनाना नोटीस बजावण्यात आली आहे. एकाच दिवशी सर्व निवासस्थानांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, भाजपचे आमदार अमित साटम यांनीही चहल यांच्यावरही आरोप केले होते. चहल हे आपले नातेवाईक राजींदर यांच्यासाठी गायक सोनू निगम मोफत शो करण्यासाठी दबाव आणून धमकी देत आहेत, ते त्यासाठी तयार न झाल्यास त्यांच्या घरावरही कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याने चहल आणि राजींदर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अमित साटम यांनी विधीमंडळात केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.