भारत सोन्यातही आत्मनिर्भर! सुवर्ण उद्योगाने उचचले ‘हे’ पाऊल

109

भारतीयांचं सोन्यावरचं प्रेम काही लपलेलं नाही. भारतीयांची हीच सोन्याची हौस भागवण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावं लागत. त्यामुळे आता भारतीय सुवर्ण उद्योगाने एक भक्कम पाऊल टाकत तब्बल 20 हजार किलो सोन्यासाठी खोदकामाची तयारी सुरु केली आहे.

भारतात किती सोने

देशाच्या सोन्याच्या खाणीत किती सोन्याचे साठे आहेत ते केंद्रीय खनिजकर्म उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समजते. देशाच्या एकूण सोन्याच्या खाणीत 7.01 टन इतके सोने आहे. कर्नाटकातील खाणींमध्ये तब्बल 88 टक्के सोने आहे, तर आंध्र प्रदेशात 12 टक्के आणि झारखंडमध्ये 0.1 टन सोने आहे. कर्नाटकातील रायचूरमध्ये हट्टी गोल्ड माइनमध्ये सर्वप्रथम 1947 साली सोन्याचे उत्खनन सुरु झाले. तेव्हापासून 2020 पर्यंत या खाणीतून एकूण 84 टन सोन्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, यातील उत्पादनाचा वेग तुलनेने अत्यल्प म्हणजे केवळ 1.9 टन इतकाच आहे.

( हेही वाचा: मुंबईतील सर्व पुलांची दर सहा महिन्यांनी तपासणी : महापालिका नेमणार तीन एजन्सी )

भारतातील सोन्याची खरेदी

भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सर्वाधीक सोने खरेदी केले जाते. भारतीयांच्या घरांत असलेल्या सोन्याचा अंदाजित आकडा हा 22 हजार 500 टन इतका असून, त्याची किंमत 1 ट्रिलियन अमेरिकी डाॅलरच्या घरात आहे. 2021च्या आर्थिक वर्षांत भारतात अडीच ट्रिलियन डाॅलर सोन्याची आयात झाली. 2020 या वर्षामध्ये भारतात एकूण 446.40 मेट्रीक इतक्या भरभक्कम सोन्याची खरेदी झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.