महिला विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना रंगला होता. यात साऊथ आफ्रिका संघाला शेवटच्या षटकात 2 चेंडूत 3 धावा हव्या असताना, दीप्ती शर्माने नो बाॅल टाकला, त्यावर झेल पकडला पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर 1-1 धावा सहज घेत दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला आणि भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला.
हे चार संघ उपांत्य फेरीत
भारताने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेपुढे 275 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आफ्रिकेच्या संघाने शेवटच्या बॉलवर पूर्ण केले. शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचचा थरार पाहायला मिळाला. अखेर चुरशीच्या लढतीत आफ्रिकेने बाजी मारली. भारताचा पराभव झाल्याने, महिला विश्वचषक 2022 च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत जाणारे चार संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरी गाठली होती आणि आता इंग्लंड आणि नंतर वेस्ट इंडिजचा संघही उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
( हेही वाचा: केजरीवालांकडून काश्मिरी पंडितांची अवहेलना! का सुरु झाला #KejriwalAgainstHindus ट्विटर ट्रेंड )
विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले
भारतीय संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासही मुकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला.
Join Our WhatsApp Community