बुरखा घातला म्हणून विरोध केला, तर हॉटेलच पाडले बंद!

87

बुरखा, हिजाब या विषयी मुस्लिम किती कट्टर आहेत, याचा प्रत्यय भारतात प्रत्येक राज्यात येत आहे. त्यामुळे मुसलमान, बुरखा हे विषय कायम चर्चेत येत आहेत.  भारतात कालपर्यंत हिजाब घालून येण्यास विरोध केला म्हणून शाळा-महाविद्यालये बंद पाडली गेली, आता तर बुरखा घालून आलेल्या महिलेला हॉटेलात प्रवेश दिला नाही, म्हणून थेट हॉटेलचं बंद पाडले.

व्यवस्थापकाला केले निलंबित 

हा प्रकार बहरीन देशात घडला आहे. या देशातील अदालिया येथील भारतीय रेस्टॉरंट बंद केल्याची घटना समोर आली आहे. रेस्टॉरंटने बुरखा घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बहरीन न्यूज आणि गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक कर्मचारी महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यास नकार देत आहे. बहरीन पर्यटन आणि प्रदर्शन प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे या घटनेनंतर रेस्टॉरंटने आपल्या व्यवस्थापकालाही निलंबित केले आहे. रेस्टॉरंटने इंस्टाग्रामवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जनतेमध्ये भेदभाव दर्शविणारे नाही, आमच्या चौकशीत व्यवस्थापकाला निलंबित केले आहे. व्यवस्थापक भारतीय असल्याचे अहवालात समोर आले आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

(हेही वाचा केजरीवालांकडून काश्मिरी पंडितांची अवहेलना! का सुरु झाला #KejriwalAgainstHindus ट्विटर ट्रेंड)

35 वर्षे जुने रेस्टॉरंट

35 वर्षांहून अधिक काळ आम्ही बहरीनच्या सुंदर राज्यात सर्वांची सेवा करत आहोत. लँटर्न हे प्रत्येकासाठी आपल्या कुटुंबासह घरात आनंद घेण्याचे आणि अनुभवण्याचे ठिकाण आहे. एका व्यवस्थापकाने चूक केली, त्याला निलंबित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध रेस्टॉरंटने 29 मार्च रोजी मोफत जेवणाची सुविधाही देऊ केली आहे. सद्भावना म्हणून आम्ही आमच्या बाजूने हे आयोजन करत असल्याचे ते सांगतात.

कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद  

बहरीनमधील घटनेनंतर हा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वाद आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याबद्दल विविध प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे, हिजाब हा इस्लामच्या धार्मिक प्रथेचा भाग नाही, असे सांगून कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.