ब्रह्मोसनंतर ‘या’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

129

ओडिशातील बालासोर येथे रविवारी मध्यम पल्ल्याच्या (एमआरएसएम) जमिनीवरून हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने दिली. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हवाई सुरक्षेला बळ मिळणार आहे. ही हवाई संरक्षण यंत्रणा देशाच्या लष्कराचा भाग आहे.

हवाई चाचणी बालासोर येथे घेण्यात आली

चाचणीत क्षेपणास्त्राने दूरवर असलेल्या लक्ष्याचा थेट वेध घेतला, अशी माहिती डीआरडीओच्या अधिका-यांनी दिली. ही चाचणी सकाळी साडेदहाच्या सुमारास घेण्यात आली. दीर्घ अंतरावर असलेले आणि अतिशय वेगवान हवाई लक्ष्य या क्षेपणास्त्राने थेट उद्ध्वस्त केले. लष्कराच्या या एमआरएसएएम क्षेपणास्त्र यंत्रणेची हवाई चाचणी बालासोर येथे घेण्यात आली. मागील महिन्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी बालासोर येथे घेण्यात आली होती. या क्षेणास्त्रासाठी वापरण्यात आलेले नवीन तंत्रज्ञान यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचा मी तिजोरीच उघडली नाही तर… कोणाला म्हणाले अजित पवार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.