एका हिंदू देवीच्या विरोधात कथितरित्या आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणार्या अकाऊंटवर कारवाई न केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ट्विटरवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला जगातील इतर प्रदेश आणि वंशातील लोकांच्या संवेदनशीलतेची काळजी नाही. जर तुम्ही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ब्लॉक करू शकता, तर हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना तुम्ही का ब्लॉक करू शकत नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर केला आहे.
न्यायालयाने ट्विटरवर केली जोरदार टीका
मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ट्विटरला विचारले की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला कसे ब्लॉक करता? या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान 28 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ट्विटरवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले की, जर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते ब्लॉक केले जाऊ शकते, तर हिंदू देवी-देवतांच्या विरोधात टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? हे प्रकरण ट्विटर अकाउंटशी संबंधित आहे. ज्यावर हिंदू देवीच्या विरोधात आक्षेपार्ह सामग्री पोस्ट करण्यात आली होती.
(हेही वाचा – सर्वसामान्यांना दणका! जाणून घ्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत आठवड्याभरात किती झाली वाढ)
खंडपीठाने ट्विटरला दिले निर्देश
मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर इथिस्ट रिपब्लिक यूजरने माँ काली या नावाने केलेल्या पोस्टच्या संदर्भात सुनावणी झाली. खंडपीठाने ट्विटरला निर्देश दिले की, काही लोकांना कसे ब्लॉक केले आहे. काही प्रकरणांमध्ये इतर धर्मांना दुखावणारे साहित्य असूनही कारवाई झाली नाही. न्यायालयाने ट्विटरला अधिक सावध आणि संवेदनशील राहण्यास सांगितले. त्यावर न्यायालयाने विचारले की मग तुम्ही ट्रम्प यांचे खाते कसे ब्लॉक केले? ट्विटरची भूमिका आणि ते खाते ब्लॉक करू शकत नाही, असे म्हणणे पूर्णपणे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community